ठाणे – रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि ब्लू स्टार कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने नौपाड्यातील रोटरी सेंटर मध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत एसी टेकनिशिअन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाले.
सध्या शहरीकरण, तापमानवाढ, उत्पन्नवाढ आणि विशेषतः रात्रीच्या तापमानात होत असलेली वाढ अशा कारणांमुळे एअर कंडिशनरच्या मागणीत खूपच वाढ झाली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. एअर कंडिशन चा वाटा एकूण विजेच्या वापरात अंदाजे ५० टक्के आहे. एका सर्वेनुसार २०१९ साली ३९ लाख AC वापरात होते. सध्याचा वाढीचा दर १० ते १२ टक्के आहे आणि फक्त ८ टक्के लोक AC वापरतात. २०३८ पर्यंत अंदाजे ५०० लाख AC वापरात असतील. AC च्या वापराबरोबरच त्यांची देखभाल करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असते. पण सद्यस्थितीत AC टेकनिशिअन तुटवडा आहे. योग्य देखभाली अभावी अंदाजे १० ते १५ टक्के जास्त विजेची वापर होतो आहे आणि त्याचा सर्वसामान्यांच्या विद्युत बिलावर परिणाम दिसून येतो. म्हणूनच रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि ब्लू स्टार जी एक अग्रगण्य भारतीय कंपनी आहे यांनी एकत्र येऊन AC टेकनिशिअन ट्रैनिंग सेंटर सुरु करण्याचे ठरवलं आहे. ब्लू स्टारने ट्रैनिंगचे सर्व साहित्य व अभ्रासक्रम पुरवला आहे. ठाणे महानगरपालिका आणि रोटरी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केलेल्या रोटरी सेंटर मध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे जिथे AC टेकनिशिअन ट्रैनिंग सेंटर सुरु करण्यात आलेले आहे.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे प्रांतपाल रो. दिनेश मेहता आणि ब्लू स्टार चे executive VP व्ही एस अशोक ह्यांच्या हस्ते ट्रैनिंग सेंटरचे उद्घाटन केले गेले. रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा रो. मेधा जोशी, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे अध्यक्ष रो. प्रशांत पात्रो, रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीचे अध्यक्ष रो. जगदीश चेलारामणी, रो. संतोष भिडे आणि रो. जितेंद्र भांबुरे जे ब्लू स्टार मध्ये R & D मध्ये VP होते, ह्यांच्या पुढाकाने टेकनिशिअन ट्रैनिंग सेन्टर कार्यान्वित केले. रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी आणि रोटरी क्लब ऑफ लेक सिटी हे ह्या उपक्रमात भागीदार आहेत.
15 ऑगस्ट पासून ट्रैनिंगची पहिली तुकडी सुरु होणार आहे. पहिल्या वर्षात २०० टेकनिशिअनना प्रशिक्षित करण्यात येईल. तरी अशा समाजपयोगी उपक्रमाने सामाजिक, आर्थिक उन्नती आणि पर्यावरण सुरक्षा हि उद्दिष्टे साध्य होतील. ठाण्यातील इच्छुकांनी सेंटरशी संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे क्लब सेक्रेटरी अमोल नाले यांनी केले आहे.