
आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या आणि मोठ्या श्रद्धेने साजऱ्या करण्यात येणाऱ्या जय अंबे धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा पाटपूजन सोहळा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रथेप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभागप्रमुख कमलेश चव्हाण तसेच मंडळाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
