
ठाण्यातील टेंभी नाका येथीलस्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची दुर्गेदुर्गेश्वरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीसाठी तयार करण्यात येत असलेल्या देखाव्याच्या कामाची पाहणी केली.
१९७८ पासून ठाणे शहरात हा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदा देवीसाठी तामिळनाडू येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा तयार करण्यात येणार आहे. यात शिवलिंगाची उंची २९ फुटांची असून ते एकाच ग्रेनाईटच्या दगडात बनवण्यात येणार आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत या कामाची पाहणी करून हा देखावा उभा करणारे कला दिग्दर्शक अमन विधाते त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभागप्रमुख कमलेश चव्हाण, टेंभी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे आणि सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.
