
ठाणे : श्री चिन्मॉय मिशन आयोजित स्वित्झर्लंडमध्ये रविवार 3 ऑगस्ट रोजी झुरिच लेक येथे पार पडलेल्या 37 वी जागतिक जलतरण स्पर्धेतील वेट सुट या गटात भारताला तब्बल 37 वर्षांनी विजय मिळाला. ठाणे महानगरपालिकेच्या मारोतराव शिंदे जलतरण तलावात सराव करणाऱ्या ठाणेकर मानव मोरेने हा ऐतिहासिक विजय प्राप्त केला. मानव ने हे 26 किमी अंतर ७ तास आणि 38मिनिटात पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकावून ठाण्यासह भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आज मानवच्या यशाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेला आ. निरंजन डावखरे यांनी उपस्थित राहून मानवचे अभिनंदन केले.
रविवारी ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त सौरभ राव यांनी मानव मोरेचा सत्कार केला. स्पर्धेत 26 निमंत्रित देशातील जलतरणपटू सहभागी झाले होते .
यामध्ये ठाणेकर जलतरणपटू मानव राजेश मोरे याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते . ही स्पर्धा 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7 वाजता रॅपर्सविल येथून सुरू करण्यात आली, सकाळी वातावरण 11 डिग्री होते तसेच पाण्याचे तापमान त्याहूनही कमी होते . त्याबरोबरच पाऊस आणि विरुद्ध बाजूने येणारा वारा या सर्व गोष्टीवर मात केला. स्वित्झर्लंड मध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठीचे निकष फार कठीण होते. या स्पर्धेत निवड झालेले जलतरणपटू सहभागी होवू शकतात. 1987 ला ह्या स्पर्धेची सुरवात झाली असून वेटसुट ह्या केटेगरी मधे भारताला आज पर्यंत कधीच पदक प्राप्त झाले नव्हते. वेटसूट ह्या गटात मेडल मिळवणारा मानव हा प्रथम भारतीय जलतरणपटू ठरला आहे.
मानव हा ठाण्यातील महापालिकेच्या कै मारोतराव शिंदे तरण तलाव येथील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशन मधे दररोज रात्री 9-11 असा सराव प्रशिक्षक कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे. मानवच्या या यशाबद्दल संसद रत्न खासदार नरेश म्हस्के आणि ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी मानवचे विशेष अभिनंदन केले
या उपक्रमा बद्दल वेळोवेळी महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने , उपाध्यक्ष श्री राजेश मोरे, सचिव श्री राजेंद्र पालकर,ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, वैभव देशमुख, ठाणे महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी , क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे, तरण तलाव व्यवस्थापकप्राची डिंगणकर, उपव्यवस्थापक रवी काळे यांची मदत मिळाली.