
ठाणे (दि8 ) पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, वेसाक इंडिया, के.जे. सोमय्या महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे पोलीस दवाखाना, ठाणे शहर येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या शिबीरात मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया देखील होणार आहे.
तरी, ठाणे शहरातील सर्व इच्छुक पोलीस अधिकारी-कर्मचारी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, विद्यार्थी-विद्यार्थीनी व त्यांचे पालक तसेच नागरिकांनी दि.10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे पोलीस दवाखाना, ठाणे शहर येथे या मोफत नेत्र तपासणी शिबीरामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.