
जान्हवीच्या गाण्यावर थिरकली शिल्पा शेट्टी;‘सुपर डान्सर 5’ मधील खास एपिसोड
डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ आपल्या दर्जेदार आणि धमाकेदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या शोमधील स्पर्धक — अध्याश्री, बरकत, सोमांश, सुकृती, आणि अप्सरा — यांच्या अप्रतिम नृत्यप्रस्तुतींनी शोला नवे यश आणि उंची मिळवून दिली आहे. प्रेक्षक या सर्व स्पर्धकांशी भावनिकरित्या जोडले गेले आहेत.
Promo link – https://www.instagram.com/p/DN5zzXVDaUY/
आता आगामी भागात या मंचावर ग्लॅमरचा जबरदस्त तडका बसणार आहे, कारण बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर शोच्या जज शिल्पा शेट्टीसोबत खास डान्स परफॉर्मन्स करताना दिसणार आहे.
एक हटके ट्विस्ट म्हणून जान्हवीने शिल्पा शेट्टीच्या आयकॉनिक गाण्यावर — “मैं आई हूँ यूपी-बिहार लूटने” — जबरदस्त डान्स करत रंगत वाढवली, तर शिल्पा शेट्टीने जान्हवीच्या सुपरहिट गाण्यावर — “झिंगाट”* — डान्स करत स्टेजवर धम्माल केली. स्पर्धकांनी आपल्या सुपरगुरूंसोबत परफॉर्म केल्याच्या थीमवरून प्रेरणा घेत शोचे होस्ट परितोष त्रिपाठी यांनी “डान्स स्वॅप” हे खास सेगमेंट तयार केले, ज्याला जान्हवी आणि शिल्पाने लगेचच होकार दिला.

परफॉर्मन्सनंतर शिल्पाने जान्हवीला विचारले, “‘झिंगाट’वर तू कशी परफॉर्म केलीस? अनुभव कसा होता?”
जान्हवी कपूरने हसत उत्तर दिले, “या गाण्यावर परफॉर्म करणं म्हणजे एक असा अनुभव आहे जो कधीच संपत नाही. मी झिंगाटवर जवळपास प्रत्येक लग्नसमारंभ, फंक्शन आणि अवॉर्ड शोमध्ये परफॉर्म करते. माझं वजन वाढत नाही कारण महिन्याला दोन-तीन वेळा मी झिंगाटवर डान्स करत असते.”
या धमाकेदार परफॉर्मन्सनं सेटवर उपस्थित प्रत्येकाला थिरकायला भाग पाडलं. स्पर्धकही स्टेजवर सहभागी झाले आणि वातावरणात एक वेगळीच ऊर्जा पसरली. जान्हवी आणि शिल्पामधील जबरदस्त ट्यूनिंग आणि केमिस्ट्रीनं हा परफॉर्मन्स वीकेंडच्या सर्वात मोठ्या हायलाइट्सपैकी एक बनवला.
*‘सुपर डान्सर चॅप्टर ५’मधील धमाल पाहायला विसरू नका – प्रत्येक शनिवार आणि रविवार रात्री ८ वाजता, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी LIV वर.*