
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा, रिपब्लिकन_सेना महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुखदा मोरे, जयश्री फाटक, जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण, शीतल ढमाले, एकता भोईर आणि राम रेपाळे यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, विभागप्रमुख एकनाथ भोईर, शिवसेना उमेदवार दीपक वेतकर, प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
: महाराष्ट्र माझा न्यूज