
दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण 2 मे रोजी देशव्यापी आपत्ती सूचना प्रणालीची चाचणी घेणार
देशभरातील लाखो मोबाईल फोनवर एकाच वेळी सायरन वाजू शकतात. जर तुमच्या मोबाईलवर देखील सायरन वाजला तर घाबरु नका…
फोनवर सायरन वाजला, तर घाबरण्याची गरज नाही. भविष्यात कोणतीही आपत्ती आल्यास लोकांपर्यंत वेळीच माहिती पोहोचवता यावी, यासाठी सरकार या अलर्ट सिस्टमची चाचणी घेणार आहे.
आपत्तीच्या वेळी लोकांना सावध करण्याचे काम करेल, जेणेकरून लोक सतर्क राहतील आणि जीवित व वित्तहानी कमी करता येईल.