
ठाणे (04) : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील विविध प्रभागात सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. आज महापालिकेच्या लोकमान्य सावरकर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 14 परिसरात दिनांक सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध विभागांच्या समन्वयातून व्यापक प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेची शपथ घेवून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत स्थानिक नगरसेवक दिलीप बारटक्के, राकेश शिंदे, स्थानिक नगरसेविका कांचन चिंदरकर, शितल ढमाले हे उपस्थित होते. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे 120 कामगारांनी सक्रिय सहभाग घेतला. मोहिमेसाठी 2 शौचालय सफाई जेटिंग गाड्या, 2 आर्यन जेटिंग गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
लोकमान्य डेपो ते ज्ञानोदय विद्यालय ते जुना डेपो, लोकमान्य डेपो ते आईमाता व भगवती विजय अपार्टमेंट परिसर, लोकमान्य डेपो ते पंचमुखी सोसायटी, डेनिस कंपाउंड ते गोकुळ डेअरीपर्यंतचा परिसर, लोकमान्य डेपो ते लोकमान्य जुना डेपो परिसरातील आतील रस्ते व गल्ली, लोकमान्य सर्कल डेपो आतील परिसर, यशोधन नगर ते ठाकूर कॉलेज ते महात्मा फुले गार्डन परिसर, आईमाता ते वर्तकनगर नाका तसेच वर्तकनगर नाका ते विजयनगर नाल्यापर्यंतच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान एकूण 7 टन कचरा व माती उचलण्यात आली. स्वच्छता मोहिमेत बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, गार्डन विभाग, ड्रेनेज विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी समन्वयाने काम केले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, कार्यकारी अभियंता संदीप सावंत, सर्व अभियंते, मुख्य स्वच्छता निरीक्षक शयुराज कांबळे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वळवी तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि सफाई कर्मचारी उपस्थित होते.
: www.MaharashtraMajhaNews.com