अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

– अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ राज्यात अन्नपदार्थांची घरपोच सेवा (ऑनलाईन) देत असलेल्या कंपन्यांच्याबाबत नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी विभागाकडून लवकरच टोल फ्री क्रमांक घोषित करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. विधान परिषद सभागृहात अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत लक्षवेधी सदस्य संदीप जोशी यांनी मांडली होती. यावेळी विरोधी…

महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ

परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील दि.1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत. त्याकरिता परिवहन विभागाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण कार्यालयासाठी M/s REAL MAZON INDIA LTD., एजन्सीची नियुक्ती केली असून HSRP बुकिंग पोर्टल लिंक/URL https://hsrpmhzone२.in आहे व दि.1 जानेवारी 2025 पासून हे काम…

43 व्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विटाव्याच्या सुष्मिता देशमुखला 3 रौप्यपदक

कर्नाटकातील दावणगेरे येथे 28 जून रोजी 43 व्या महिला सीनियर राष्ट्रीय इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025, पॉवरलिफ्टिंग इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या स्पर्धेत ठाण्याची सुष्मिता सुनील देशमुख हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत 52 किलो वजनी गटात खेळून क्वॅट या प्रकारात कांस्य पदक पटकविले. बेंचप्रेस या प्रकारात रौप्य पदक पटकावले, डेड लिफ्ट या प्रकरणात रौप्य पदक पटकावले…