
नागरी सहकारी बँक क्षेत्रातील अग्रणी असलेल्या जीपी पारसिक सहकारी बँकेला महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक फेडरेशनने दोन हजार पाचशे कोटी ते पाच हजार कोटी पर्यंत ठेवी असलेल्या गटामध्ये सर्वोत्कृष्ठ बँकेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले. सदर पुरस्कार बँकेचे अध्यक्ष विक्रम पाटील, सोबत संचालक रणजीत पाटील, नारायण गावंड, दशरथ पाटील, कयुम चेऊलकर व संचालिका राजश्री पाटील यांनी सहकार क्षेत्राच्या राष्ट्रीय संघटनेचे सदस्य ज्योतिन्द्र मेहता, फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा यांच्या हस्ते नाशिक येथे झालेल्या जाहीर समारंभात स्वीकारला. सदर पुरस्कार म्हणजे बँकेने केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीची पावतीच आहे असे बँकेने म्हटले आहे.