
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण सहाव्यांदा एकत्र, ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंगला झाली सुरुवात!
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या सोशल मिडिया हँडलवर एक भावनिक पोस्ट शेअर करत सुपरस्टार शाहरुख खानसोबत त्यांच्या आगामी चित्रपट ‘किंग’ च्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे. ‘किंग’ हा दीपिका आणि शाहरुख यांचा सहावा चित्रपट आहे. दोघांनी याआधी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, ज्याची सुरुवात 2007 मध्ये आलेल्या दीपिकाच्या पदार्पणाच्या चित्रपट ‘ओम शांती ओम’ पासून झाली होती.
दीपिकाने शनिवारी तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने ‘ओम शांती ओम’ च्या शूटिंगच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, शाहरुखने तिला एक अमूल्य धडा दिला होता, जो ती आजही तिच्या प्रत्येक निर्णयामध्ये अनुसरत आहे.
दीपिका आणि शाहरुख यांची जोडी चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यांनी 2013 मध्ये आलेल्या ‘चेन्नई एक्सप्रेस’, 2014 च्या ‘हॅपी न्यू ईयर’ आणि 2023 च्या ब्लॉकबस्टर ‘पठाण’ मध्ये एकत्र काम केले आहे. याशिवाय, ‘जवान’ (2023) हा त्यांचा एकत्रित शेवटचा चित्रपट होता.
आता या जोडीने पुन्हा एकदा ‘किंग’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परत येण्याची तयारी केली आहे, आणि त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरत आहे.
https://www.instagram.com/p/DOy87swjBhk/?igsh=MmdoZGdlaTcyc2x1