
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व मा. अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व मा. उप आयुक्त (अतिक्रमण/अ.बां.नि.वि.) संजय शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली कार्यालया अंतर्गत घर क्र- 166, ऐरोली गाव, ऐरोली, नवी मुंबई येथे हितेश किशोर कोटकर यांनी बांधकाम परवानगी व्यतिरिक्त अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते.
हितेश किशोर कोटकर, घर क्र- 166, ऐरोली गाव, ऐरोली, नवी मुंबई यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांस जी विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये दि. 16.04.2026 रोजी नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
सदरचे अनधिकृत बांधकाम साधना पाटील, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी ऐरोली, यांचे नियंत्रणाखाली तोडक मोहिमेचे आयोजन करुन सदर अनधिकृत बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले.
धडक मोहिमेसाठी जी-विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी / कर्मचारी, मजूर 16, ब्रेकर-3, गॅसकटर-1, तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.