
ठाणे |
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा ठाम संदेश ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांनी जाहीर मोर्चादरम्यान पत्रकारितेबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ ठाणे महापालिका मुख्यालयासमोर पत्रकारांनी काळ्या फिती लावून आणि निषेधाचे फलक हातात घेऊन जोरदार निदर्शने केली. यावेळी अविनाश जाधव यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
पत्रकारितेचा सन्मान राखलाच पाहिजे!
पत्रकारिता ही केवळ बातम्या देणारी व्यवस्था नसून, जनतेचे प्रश्न मांडणारी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारी लोकशाहीची महत्त्वाची ताकद आहे. बातम्यांशी मतभेद असू शकतात, टीकाही करता येते; मात्र संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राला अपमानास्पद शब्दांत संबोधून बदनाम करणे योग्य नाही.
दिल्लीतील पत्रकारांवरील मारहाणीचाही निषेध!
आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर दिल्ली पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीचा तसेच महिला पत्रकारांशी झालेल्या गैरवर्तनाचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने तीव्र निषेध केला. पत्रकारांना निर्भयपणे वार्तांकन करता यावे आणि त्यांच्या सुरक्षिततेची हमी मिळावी, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली.
● पत्रकारांचा सन्मान, सुरक्षितता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहिलेच पाहिजे!
पत्रकारांच्या लेखणीचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
#ठाणेशहरदैनिकपत्रकारसंघ#पत्रकारएकता#पत्रकारांचासन्मान#पत्रकारसुरक्षा#लोकशाहीचाचौथास्तंभ#पत्रकारितास्वातंत्र्य#ThaneNews#JournalistSafety
#avinashjadhavmns
#RajThackeray
See less