
नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांसह नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील विकासप्रकल्प, केंद्र-राज्य समन्वय, पावसाची स्थिती, आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि संसदीय कामकाजावर चर्चा झाली.

पंतप्रधान मोदी यांनी एनडीएतील एकजूट अधोरेखित करत राज्याच्या प्रगतीसाठी पूर्ण पाठबळ देण्याची ग्वाही दिली. या भेटीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे खासदार उपस्थित होते.
