
क्लस्टर, डीपी रोड आणि रिंग मेट्रो प्रकल्पाला गती देण्याचा ठामपा सभागृह नेते हणमंत जगदाळे यांचा निर्धार
लोकमान्यनगर-शास्त्रीनगरवासियांचा निर्धार मेळावा उत्साहात संपन्न
ठाणे – लोकमान्यनगर-शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांना हक्काची, अधिकृत आणि मालकी हक्काची घरे मिळवून देण्यासाठी तसेच परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘निर्धार मेळावा’ रविवारी (दि. २७ सप्टेंबर) लक्ष्मी पार्क रोड येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याला ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते तथा ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या हक्काच्या अधिकृत घरांच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला. एकाही बाधित कुटुंबाच्यापुनर्वसनाच्या हक्कावर अन्याय होऊ न देता क्लस्टर पुनर्विकास, डीपीरस्ते आणि रिंग मेट्रोच्या अंमलबजावणीला गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. परिसरातील तब्बल १० हजारांपेक्षा अधिक रहिवासी यावेळी उपस्थित होते.
नगरसेवक दिलीप बारटक्के, नगरसेवक अमित सरैय्या, नगरसेवक प्रशांत जाधवर , नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेवक योगेश जानकर, नगरसेवक मनोज शिंदे, नगरसेविका कांचन चिंदरकर, नगरसेविका वनिता घोगरे, नगरसेविका सरिता ठाकूर, नगरसेविका दर्शना जानकर, मनसेचे नेते अविनाश जाधव, रवींद्र मोरे, माजी नगरसेविका सौ. राधाबाई जाधवर , दिगंबर ठाकूर, संभाजी पंडित, संतोष पाटील – (मा. परिवहन सदस्य), विजय चिंदरकर, मंगेश ठाकूर, पुरुषोत्तम ठाकूर, संदीप घोगरे, हेमचंद्र राठीवडेकर (उबाठा – विभागप्रमुख), संदीप चव्हाण – (मनसे – शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष विद्यार्थी सेना), धनंजय येंडे (शाखाप्रमुख – उबाठा), श्याम पडवळ, दीपक आवारी, संतोष शेलार, दीपक गायकवाड – (शहर उपाध्यक्ष – भा.ज.पा.), भरत जाधव, जगन्नाथ राऊत, एकनाथ पाटील (लोकमान्य नगर शास्त्रीनगर फेडरेशन अध्यक्ष) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

लोकमान्यनगर आणि शास्त्रीनगर परिसराशी आपले नाते केवळ राजकीय नसून ते अनेक वर्षांच्या जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे आहे. या परिसरातील प्रत्येक कुटुंबाच्या सुख-दुःखाशी आपले नाते जोडलेले आहे. त्यामुळे या परिसराचा विकास आणि नागरिकांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न हा केवळ राजकीय विषय नसून येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याशी संबंधित असल्याचे जगदाळे यांनी यावेळी सांगितले.
लोकमान्यनगर-शास्त्रीनगर परिसरातील अनेक नागरिक वर्षानुवर्षे दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आणि जुन्या, अनधिकृत इमारतींमध्ये राहत आहेत. या नागरिकांना सुरक्षित आणि अधिकृत घरे मिळणे आवश्यक आहे. क्लस्टर पुनर्विकासाच्या माध्यमातून नागरिकांना याच परिसरात मालकी हक्काची घरे मिळावीत, ही आपली भूमिका आहे. मात्र, पुनर्विकासाच्या नावाखालीकोणत्याही कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही. सर्वेक्षण, बाधितकुटुंबांची निश्चिती, तात्पुरतीव्यवस्था आणि कायमस्वरूपी पुनर्वसन याबाबतची प्रक्रिया त्यांनी नागरिकांसमोर स्पष्टकेली.
मात्र, पुनर्विकासाच्या नावाखाली कोणत्याही कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही. किती कुटुंबे बाधित होणार आहेत, त्यांचे पुनर्वसन कुठे होणार आहे आणि त्यांना कोणत्या स्वरूपात घरे मिळणार आहेत याची माहिती हणमंत जगदाळे यांनी उपस्थितांना दिली.
क्लस्टर पुनर्विकासासोबतच परिसरातील डीपी रोड आणि रिंग मेट्रो हे प्रकल्पही नागरिकांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहेत. या प्रकल्पांमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास आणि नियोजित विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. नागरिकांचे सुरक्षित पुनर्वसन आणि विकासकामांची अंमलबजावणी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जगदाळे यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत कितीही अडथळे निर्माण झाले, तरी नागरिकांच्या हक्कांसाठी आपला पाठपुरावा सुरूच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते, नगरविकास मंत्री, गृहनिर्माण मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असून, त्यांच्या सहकार्याने लोकमान्यनगर-शास्त्रीनगरच्या विकासाचा मार्ग अधिक वेगाने पुढे नेता येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुनर्विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांना विश्वासात घेणे, सर्वेक्षण पूर्ण करून बाधित कुटुंबांची निश्चित संख्या ठरवणे, तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करणे आणि कायमस्वरूपी पुनर्वसनाचा स्पष्ट आराखडा तयार करणे यावर जगदाळे यांनी भर दिला. तसेच ठाणे महानगरपालिका, म्हाडा, एमएमआरडीए आणि संबंधित शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकमान्यनगर-शास्त्रीनगरचा विकास हा नागरिकांच्या सहभागातून आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करूनच झाला पाहिजे. परिसराला आधुनिक नागरी सुविधा मिळण्यासोबतच प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि हक्काचे घर मिळावे, हेच आपले ध्येय असल्याचे जगदाळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
सर्वेक्षण म्हणजे विस्थापननाही आणि मोजणी म्हणजे तोडकाम नाही. प्रस्तावित कामांमुळे नेमकी किती कुटुंबे बाधितहोऊ शकतात, हे निश्चितझाल्याशिवाय त्यांच्या पुनर्वसनाचे नियोजन तरी कसे होणार, असासवाल जगदाळे यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या मनात अनाठायी भीती निर्माण करण्याऐवजीवस्तुस्थिती समजून घेऊन हक्क सुरक्षित ठेवत विकासाची प्रक्रिया पुढे नेली पाहिजे, असेत्यांनी सांगितले.
लोकमान्यनगर-शास्त्रीनगरवासीयांच्या हक्काच्या घरांसाठी आयोजित या निर्धार मेळाव्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांच्या उपस्थितीमुळे लक्ष्मी पार्क रोड परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. पुनर्विकासाच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडण्यासाठी आणि परिसराच्या भविष्यातील विकासाबाबत जाणून घेण्यासाठी नागरिकांनी मेळाव्यात सहभाग घेतला.